खानापूर : खानापूर येथे घडलेल्या अरबाज खून प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखानी दहा जणांना अटक केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निम्बर्गी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
त्या प्रकरणात चाळीसहून अधिक जणांना तपासासाठी ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान 10 जणांनाअटक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख यांनी दिली आहे.
अरबाज खून प्रकरण संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय बनले होते. या खून प्रकरणाची चर्चा सर्वत्र सुरू होती. या प्रकरणाची सीओडी आणि सीआयडीकडे तपास द्यावा अशी मागणीही करण्यात आली होती. प्रेम प्रकरणातून सुपारी घेऊन हा खून झाला आहे.
या पार्श्वभूमीवर दहा जणांना अटक झाली असून आता या पुढील तपास सुरू आहे. प्रेमप्रकरणातूनच हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे