बेळगाव : शहरातील भारतीय मुस्लिम सोशल अँड इकॉनोमिक डेव्हलपमेंट फोरम बेळगावतर्फे विविध मागण्यांची निवेदनं आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आली.
भारतीय मुस्लिम सोशल अँड इकॉनोमिक डेव्हलपमेंट फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. अलीकडेच गेल्या 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील किटवाड (ता. चंदगड) धबधब्याच्या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेत पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या त्या 4 युवतीच्या कुटुंबीयांना सरकारने आर्थिक सहाय्य करावे. कणबर्गी रोड, रामतीर्थनगर पहिला क्रॉस येथे अतिक्रमण हटाव मोहीम राबवून ज्या मुस्लिम अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीयांची घरे पाडण्यात आली. त्या नुकसानग्रस्त बेघरांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बुडाने घरांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच मुस्लिम अल्पसंख्यांकांना सध्या 4 टक्के राखीवता देण्यात आली आहे. सरकारने ही राखीवता वाढवून 8 टक्के करावी, अशा मागण्यांची निवेदने सविस्तर तपशीलासह जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आली आहेत. ही तीनही निवेदनं सादर करतेवेळी भारतीय मुस्लिम सोशल अँड इकॉनोमिक डेव्हलपमेंट फोरम बेळगावच्या पदाधिकाऱ्यांसह मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta