Friday , March 6 2026
Breaking News

जिल्ह्यातील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी सायकलिंग स्पर्धा : अनिल पोतदार

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पोतदार यांनी दिली

बेळगाव येथे कार्यरत असलेल्या जिल्हा सायकलिंग असोसिएशनतर्फे महांतेश नगर येथील जिल्हा सहकारी दूध संघाच्या सभागृहात यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. अनिल पोतदार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. केएमएफचे जिल्हाध्यक्ष विवेकराव पाटील यांचे वडील दिवंगत व्ही. एल. पाटील हे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सायकलिंगचा प्रचार केला जात आहे. आता ग्रामीण स्तरावरील सायकलस्वारांना प्रोत्साहन देण्यासाठी 15 शैक्षणिक तालुक्यांतील 8वी ते 10वीच्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची योजना आहे. 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील 15 शैक्षणिक तालुक्यांमध्ये सायकलिंग स्पर्धा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शिक्षण विभाग बेळगाव आणि चिक्कोडी विभाग, जिल्हा सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने निवड करण्यात येत आहे. तालुकास्तरीय माध्यमिक शाळांमधून 50 मुले आणि 25 मुली असे एकूण 75 विद्यार्थी निवडले जावेत. प्रत्येक तालुक्यातील प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणार्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर स्पर्धा करण्याची संधी दिली जाईल. आगामी काळात त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करता यावी यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. केएमएफचे व्यवस्थापकीय संचालक जी. श्रीनिवासन, केएमएफचे संचालक बी. व्ही. कट्टी, सुरेश पाटील, आर. एस. पुजारी, डॉ. बसवराज परवण्णवर आदी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *