
बेळगाव : अलिष्का अनिल बेनके हिच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त बसवान कुडची येथील नागनुरी श्री बसवेश्वर ट्रस्ट वृद्धाश्रममध्ये मुलींना लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीना अनिल बेनके यांच्या उपस्थितीमध्ये वृद्धाश्रम मधील मुलींना विविध वस्तू प्रदान करण्यात आल्या. एंजल फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम केक कापून अलिष्काचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर वृद्धाश्रममधील मुलींना गरजू वस्तूंचे वितरण करण्यात आले. वाढदिवसानिमित्त आपणाला सेवा करण्याची संधी लाभली माझे भाग्य समजतो, असे म्हणत मीना बेनके यांनी वृद्धाश्रममधील मुलांच्या चेहऱ्यावर एक आनंद निर्माण केला, यावेळी सुरेखा पाटील, उज्वला व प्राजक्ता यांनी एंजल फाउंडेशनच्या कार्याची स्तुती केली, आणि यापुढेही अशीच सेवा घडो असे म्हणत कृतज्ञता व्यक्त केली, कार्यक्रमाला संस्थेच्या प्रज्ञा शिंदे, अक्काताई सुतार, भारती बुडवी, श्रीधर बुडवी, सनद चौगुले, सोदीनाथ शंकरगौडा, श्रीमती पाटील यासह इतर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta