
पणजी : कुंडई गोवा येथील दत्त पद्मनाभ पीठ येथे मार्गशीर्ष गुरुवर दत्तगुरुवर सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत उपस्थित होत्या. पद्मश्री ब्रह्मानंद स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली हा आश्रम चालतो. सदर सोहळ्यामध्ये डॉ. सोनाली सरनोबत यांनी जीवनामध्ये अध्यात्मासोबत आरोग्याचे महत्व पटवून दिले. सदर कार्यक्रम खानापूर तालुक्यातील इदलहोंड, कुप्पटगिरी व रामगुरवाडी येथील भक्तांनी आयोजित केला होता.
यावेळी संकल्प आमोणकर (भाजपा आमदार मुरगाव गोवा), राकेश नंदगडकर मार्व्हलस बेळगाव), ऍड. सुरेश रायकर यांच्यासह इतर भक्तगण उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta