बेळगाव : सीमा प्रदेशातील मराठी भाषिकांचे प्रश्न ऐकून त्यावर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्राचे सीमाप्रश्न समन्वयक मंत्री सीमाभागातील मराठी भाषिकांना भेटण्यासाठी बेळगावला येणार आहेत. परंतु कर्नाटक सरकारने त्यांना रोखण्याचे प्रयत्न चालू केले आहेत, यामुळे घटनात्मक अधिकाराची पायमल्ली होणार आहे. याबाबत पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री श्री. अमित शाह यांना लिहिलेल्या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिल्लीला पाठविण्यासंदर्भात म. ए. समितीचे एक
शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची भेट घेणार आहेत. तरी पदाधिकारी, नागरिक, कार्यकर्ते यांनी मंगळवार दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जमावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta