Sunday , December 14 2025
Breaking News

निवेदन देण्याकरिता गेलेल्या समिती नेत्यांना अटक

Spread the love

बेळगाव : महाराष्ट्र सीमासमन्वयक मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्यावर बंदी घालण्यात आल्याने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरिता गेलेल्या समिती कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातून येणाऱ्या नेत्यांची अडवणूक करू नका, या मागणीसाठी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 144 कलम लागू असताना अशाप्रकारे निवेदन देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने जमणे चुकीचे असल्याचे कारण पुढे करत, नेहमीसारखी आडमुठी भूमिका पोलिसांनी घेतली असून या पार्श्वभूमीवर सर्व नेते मंडळींना ताब्यात घेण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून समितीच्या जवळपास 40 हुन अधिक नेत्यांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात हजर केले आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, युवा नेते आर. एन. चौगुले, आर. आय. पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, शिवाजी सुंठकर, आबासाहेब दळवी, शिवाजी मंडोळकर, ऍडव्होकेट एम. जे. पाटील, मोतेश बार्देशकर, वकील अमर यळ्ळूरकर, सुधीर चव्हाण, चंद्रकांत कोंडुस्कर यांच्यासह 40 हून अधिक समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पतीकडून पत्नी आणि कुटुंबियांचा पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

Spread the love  अथणी : पतीच्या घरी झालेल्या भांडणामुळे कंटाळून आपल्या गावी गेलेल्या पत्नी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *