येळ्ळूर : सीमा भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी सीमा समन्वयक मंत्री बेळगावला येणार होते परंतु कर्नाटक सरकारने सुरुवातीपासूनच त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, यामुळे घटनात्मक अधिकारांची पायमल्ली झाली म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने एक पत्र देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लिहिले होतो. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे पत्र दिल्लीला पाठवण्यासाठी म. ए. समितीचे शिष्टमंडळ मंगळवार रोजी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार होते परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन न स्वीकारताच कर्नाटकी पोलिसांनी म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांना दडपशाही करून अटक केली. त्याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर महाराष्ट्रातील बसेसवर कर्नाटकातील गुंडानी दगडफेक केली व प्रवाशांना दुखापत झाली, हे त्वरित थांबले पाहिजे अन्यथा येळ्ळूरची जनता स्वस्त बसणार नाही, असा इशारा येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती सरकारला देत आहे.
येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी, सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर, दुदाप्पा बागेवाडी, राजु पावले, ग्राम पंचायत अध्यक्ष सतिश पाटील, सदस्य रमेश मेणसे, शिवाजी नांदुरकर, राकेश परिट, परशराम परिट, दयानंद उघाडे, जोतिबा चौगुले, प्रमोद पाटील, विलास घाडी, शिवाजी कदम, मधू पाटील, विलास घाडी, दत्ता उघाडे, परशराम घाडी, प्रकाश मालुचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta