बेळगाव : अनसुरकर गल्ली बेळगांव येथील ‘कॅपिटल वन’ या संस्थेच्या वतीने शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत एस.एस.एल.सी. च्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. संस्था गेली 12 वर्षे या व्याख्यानमालेचे आयोजन बेळगांव शहरातील विध्यार्थ्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या समृध्द अशा विध्यार्थ्यांसाठी, आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या म्हणजेच काठावर पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची तयारी कशी करावी, अशा दोन स्वतंत्र विभागात केले आहे.
अभ्यासक्रमातील अडचणींवर योग्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला उत्तम आकार देण्याकरीता कॅपिटल वनने उचललेले हे पाऊल आहे. मध्यंतरीच्या काळात कोविड महामारीमुळे यात खंड पडला असला तरी, संस्थेने या वर्षी पुन्हा जोमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
सदर व्याखायनमालेची सुरुवात 18 डिसेंबर 2022 ते 29
जानेवारी 2023 या कालावधीत ज्योती महाविद्यालय कॅम्प बेळगांव येथे दर रविवारी सकाळी 8.15 ते 12.00 या वेळेत भरविण्यात येणार आहेत. व्याख्यानमालेच्या उदघाटनाचा कार्यक्रम रविवार दि. 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी ठीक 8.00 वाजता ज्योती महाविद्यालयातील सभागृहात संचालक मंडळ व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे, असे संस्थेचे चेअरमन श्री. शिवाजीराव हंडे यांनी कळविले आहे.
संस्थेकडे शाळा मुख्याध्यापकांनी केलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या नोंदणीप्रमाणे बहुसंख्य विध्यार्थी या व्याख्यानमालेचा लाभ घेणार असून सर्व विद्यार्थी वर्गानी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.