बेळगांव : कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदचे कार्यालय व नामफलकाचे उद्घाटन दि. 8 ऑक्टोबर 2021 रोजी खानापूर येथे पार पडले.
उद्घाटन आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करुन पुजा केली. अभिलाष देसाई यांनी स्वागत केले. त्यानंतर आमदार अनिल बेनके यांचा सत्कार करण्यात आला. कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद खानापूर तालुका अध्यक्ष म्हणून अभिलाष देसाई यांना अध्यक्षस्थान देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
या संदर्भात बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले की, मी, समाजाचे वरिष्ठ नेते, सल्लागार मंडळी, मराठा समाजाचे प्रत्येक गल्लीतील पंच कमिटी व कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदचे सर्व पदाधिकारी मिळून संपुर्ण मराठा समाजाचा शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक दृष्टीकोनातून विकासा व्हावा यासाठी प्रयत्न करु असे म्हणाले.
जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार, भाजपा तालुकाध्यक्ष संजय कुबल, कॅप्टन चांगाप्पा पाटील यांनीही यावेळी आपले विचार मांडले.कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद तालुकाध्यक्ष अभिलाष देसाई, क्षत्रिय मराठा परिषद तालुका उपाध्यक्ष अप्पय्या गुरव, अॅड. एच. एन. देसाई, माजी जि. पं. सदस्य बाबुराव देसाई, भाजपा नेते किरण यळ्ळूरकर, अॅड. श्री. भोसले, अॅड. आनंद देसाई, बाबु चिगनगौडर, संदीप शेमले, शुभम पाटील, शिवा मयेकर, दिलीप सोंटक्के, डी. एम. भोसले, रमेश पाटील कुस्ती संघटना, बेळगांव क्षत्रिय मराठा परिषद सेके्रटरी संजीव भोसले आदी मान्यवर जिल्हा व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमेश पाटील यांनी केले तर सिताराम बेडरे यांनी आभार मानले.
Check Also
खानापूर-लोंढा महामार्गावर अपघात : एक ठार, एक गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : खानापूर-लोंढा महामार्गावर जोमतळे गावानजीक, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी वेगाने रस्त्या …