Saturday , May 25 2024
Breaking News

डॉ. सागर मित्तल यांना रुग्णसेवेसाठी पुरस्कार प्रदान

Spread the love

बेळगाव : माधवबाग आयुर्वेद कार्डियाक क्लिनिक व हॉस्पिटल याचा कर्नाटक राज्याचा वार्षिक सन्मान सोहळा नुकताच हुबळी या ठिकाणी पार पडला. यात शहापूर शाखेचे डॉ. सागर मित्तल यांना आऊटस्टँडिंग परफॉर्मन्स इन डायबेटीस व हार्टडीसिज रिव्हरसल कर्नाटक रिजन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेले 9 वर्ष डॉ. सागर यांनी माधवबागच्या डिसीज रिव्हर्सल कन्सेप्टला हाताशी धरून बेळगाव व ग्रामीण भागातील 2000 हून अधिक मधुमेह, उच्च रक्तदाब, ब्लोकेजेस व हदयविकार त्रासातून मुक्त करण्यासाठी घेतलेली मेहनतीची दखल माधवबाग घेतली. आज त्याचे सगळ्यात जास्त रुग्ण मधुमेह मुक्त, हृदयविकारमुक्त आहेत. आजही ते चांगली व तत्पर सेवा देत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन माधवबागचे सीईओ श्रीपाद उपासनी व योगेश वालावलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. माधवबाग कर्नाटकाविभागाचे रिजनल हेड डॉ. प्रसाद देशपांडे, मेडिकल झोनल हेड निलेश कुलथे, व ओपीडी व्हर्टिकल हेड दिपक कुलकर्णी ही होते.

About Belgaum Varta

Check Also

मराठा सेवा संघातर्फे बाल कल्याण कक्ष प्रशिक्षण वर्ग

Spread the love  बेळगाव : मराठा सेवा संघ, बेळगाव यांच्यावतीने दररविवारी सकाळी १०.०० ते १२.०० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *