बेळगाव : माळमारुती पोलिसांनी एका अट्टल मोटरसायकल चोरट्याला गजाआड करून त्याच्याकडील सुमारे 7 लाख रुपये हुन अधिक किमतीच्या 11 मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सदाशिव कट्टीमणी आणि माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहर आणि आसपासच्या परिसरात मोटरसायकलींची चोरी करणार्या एका चोरट्याला गजाआड केले आहे.
या चोरट्यांकडून सुमारे 7 लाख रुपये हुन अधिक किमतीच्या 11 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई करणार्या माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकात पीएसआय होन्नप्पा तळवार, एएसआय ए. बी. कुंडेद, ए. जी. कुरेर, के. डी. नदाफ, जगन्नाथ भोसले, बसवराज कल्लपनावर, सी. आय. जेगरी, एस. एम. गडदैगोळ आणि एल. एम. मुशापुरे या पोलिसांचा सहभाग होता.
सदर कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांसह पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे व रहदारी) यांनी वरील तपास पथकाचे अभिनंदन करून त्यांना बक्षीस जाहीर केले आहे.
Check Also
भारत विकास परिषदेच्या “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा अपूर्व उत्साहात संपन्न
Spread the love बेळगाव : भारत विकास परिषदेवतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा जीजीसी …