प्रा. सुरेश कांबळे : डॉ. आंबेडकर विचार मंचची चिंतन बैठक
निपाणी : अलीकडच्या काळात समाजामध्ये राजकीय नीतिमूल्ये यांच्यामध्ये अतिशय नकारात्मक भावना निर्माण होऊन समाजाला दिशाहीन बनवणार्या व्यवस्थेत खर्या अर्थाने शोषितांची अवस्था वाईट होत आहे. हा समाज जगण्यासाठी धडपडत आहे. परंतु प्रस्थापित समाज वस्तीमध्ये अशा गरीब समाजाला दुर्लक्षित ठेवून राजकीय लाभ उठवणार्या अनेक शक्ती समाजामध्ये निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सहाजिकच शोषितांची एक पिढी निर्माण होत आहे. अशा प्रकारचे जगणे आपल्या वाट्याला आलेले आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे अशा समाजातील अन्यायग्रस्त शोषित वंचितांच्या जगण्याला बळ दिले पाहिजे, असे मत प्रा. सुरेश कांबळे यांनी व्यक्त केले. येथील डॉ. आंबेडकर विचार मंचतर्फे आयोजित चिंतन बैठकीत प्रा. कांबळे बोलत होते.
प्रा. कांबळे म्हणाले, समाजाने संघटीत होऊन शिक्षणावर भर दिला पाहिजे. शासनाच्या अनेक योजना असून त्याचा संघटनेतर्फे पाठपुरावा केला जात आहे. विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्तीसह अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्याचा लाभ घेऊन स्वत: कुटुंबाचे जीवनमान उंचावण्याची गरज आहे. आतापर्यंत संघटनेमार्फत अनेक दीनदलित गरजूंना न्याय मिळवून दिला आहे. यापुढेही संघटनेचे हे कार्य निरंतर पणे सुरु राहणार आहे. यावेळी रमेश कांबळे, किसन दावणे, संदीप माने, अमित शिंदे, अशोक लाखे, प्रा. सिद्धार्थ भोसले, रतन पोळ, साजन घस्ते यांनी विचार व्यक्त केले. सुरुवातीला दीपक शेवाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी संघटनेच्या सर्व भीमसैनिकांचा वतीने शोषितांच्या जगण्याला बळ देण्यासाठी विविध रोजगार उपलब्ध करून देण्याचा एक मुखी निर्णय झाला.
चिंतन बैठकीला पिंटू माने, प्रतिक मधाळे, राहुल भोसले, संतोष कांबळे, जितेंद्र कांबळे, रवी कांबळे, महेश चव्हाण, स्वप्निल मधाळे, प्रवीण सौंदलगे, प्रथमेश कांबळे, विजय कांबळे, करण कांबळे, संदीप कांबळे, अविनाश माने, भिकाजी कांबळे यांच्यासह परिसरातील तरुण वर्ग उपस्थित होता.
Check Also
पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …