समाज कल्याण विभागातून निधी मंजूर
बेळगाव : समाज कल्याण विभागातून येथील वंटमुरी कॉलनीतील विकास कामाला चालना देण्यात आली आहे. या भागात अनेक दिवसांपासून रस्ते, गटार, ड्रेनेज, पथदीप यासह अनेक सुविधांचा अभाव होता. त्यामुळे येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन या भागातील विकास कामाला प्रारंभ करण्यात आला आहे.
सदर कामाचा शुभारंभ आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आला. या ठिकाणी रस्ता, गटार, सीडी वर्क यासह आदी कामे हाती घेण्यात आली आहेत.
सदर कामाला समाज कल्याण विभागातून 21,60,000 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यावेळी नगरसेविका लक्ष्मी महादेव राठोड, दत्ता बिलावर, ज्योती हुलेंनावर, श्रीशैल उदेशी, संजू कदम, प्रसाद देवरमणी, राजू ठोमरे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
