
बेळगाव : सावित्रीबाई फुले जयंती निमित्त येथील केळकर बाग मधील प्राथमिक कन्नड शाळेमध्ये साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याबद्दल एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांनी माहिती दिली.
यावेळी एंजल फाउंडेशनच्या वतीने येथील सरकारी शाळेला सिलिंग फॅन देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास आम्ही ती करू अशी ग्वाही यावेळी मीनाताई बेनके यांनी दिली.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका उगार मॅडम, मिलन पवार, प्रज्ञा शिंदे, आकाश हलगेकर यांच्यासहित शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta