बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतमध्ये ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून 74वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याच बरोबर आंबेडकर चौक येळ्ळूर या ठिकाणी येळ्ळूर ग्राम पंचायत उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर यांच्या वतीने ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य सदस्या, कर्मचारी वर्ग, दलित संघटनेचे कार्यकर्ते, शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक तसेच अंगाणंवाडी शिक्षिका, विद्यार्थी व श्री शिवाजी विद्यालयाचे एनसीसी कॅडेट व येळ्ळूर वाडी शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta