बेळगाव : वादग्रस्त के. एस. भगवान आणि बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करून श्रीराम आणि श्री राम चरित मानस यांचा अवमान करणाऱ्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी हिंदू जनजागृती समिती आणि सर्व हिंदू संघटनांनी केली.
कर्नाटकातील लेखक के एस भगवान यांनी प्रभू श्री रामचंद्रांविषयी अश्लाघ्य वक्तव्य केले आहे तर श्री रामचरित मानस ह्या ग्रंथाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी हिंदू जनजागृतीच्या करून हिंदुस्थानातील हिंदू धर्मस्थळांवर होणारे हल्ले आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा हिंदु जनजागृती समिती, बेळगावचे जिल्हा समन्वयक हृषिकेश गुर्जर यांनी दिला. धर्मनिंदा प्रतिबंधक कायदा लागू करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यासंदर्भात बोलताना श्रीराम सेनेचे रवी कोकितकर यांनी प्रभू श्री राम तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तसेच प्रतिमेची विटंबना करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
त्याचप्रमाणे आणखी एका सदस्यांनी सांगितले की, हिंदू देवदेवतांची तसेच महापुरुषांची विटंबना आणि त्यांच्याबद्दलचे केलेलं चुकीचे वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही. त्यांना धडा शिकवण्यासाठी रस्त्यावर उतरायला हवे. या सर्व हिंदुविरोधी शक्तींचा आम्ही निषेध व्यक्त करतो. यावेळी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर काण्यात आले.
यावेळी पंकज घाडी, मल्लिकार्जुन गुडगी, विजय होंडाड, सदानंद मासेकर, आक्काताई सुतार, मिलन पवार, काशिनाथ शेट्टी, सुधीर हेरेकर, उज्वला गावडे, सविता आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta