बेळगाव : कार्तिक मासानिमित्त विष्णू गल्ली वडगाव येथील श्री विष्णू मंदिरामध्ये 1 लाख वातींच्या दिव्यांचा दीपोत्सव कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी उत्साहात पार पडला.
विष्णू गल्ली वडगाव येथील श्री विष्णू मंदिरामध्ये श्री गिरिवर दास यांच्या पुढाकाराने सातत्याने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. सध्या कार्तिक मासानिमित्त या मंदिरात दीपोत्सव साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने कार गुरुवारी सायंकाळी 1 लाख वातींचे दिवे प्रज्वलित करून संपूर्ण विष्णु मंदिर दिव्यांनी सजविण्यात आले होते. परिणामी मंदिर परिसर या दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. सदर मंदिरात पुढील पौर्णिमेपर्यंत या पद्धतीने दररोज सायंकाळी 7 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत दिपोत्सव साजरा केला जाणार आहे.
कार्तिक मासानिमित्त काल सायंकाळी श्री गिरवर दास यांचा ‘दामोदर लीला’ यावर प्रवचनाचा कार्यक्रम देखील पार पडला. सदर कार्यक्रमास बहुसंख्य अबालवृद्ध भाविक उपस्थित होते. प्रवचनानंतर प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Check Also
महामेळाव्यास परवानगी नाकारली तर कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांना महाराष्ट्र सीमेवर अडवू
Spread the love शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा इशारा कोल्हापूर : बेळगाव येथे ९ डिसेंबर …