बहुजन समाजाची मागणी : नगराध्यक्ष भाटले यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन 1925, 1932, 1936, 1938, 1946 व 1952 सालामध्ये निपाणी नगरीमध्ये सभा झाल्या आहेत. त्यामुळे निपाणी नगरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावण झालेने आबेडकर चळवळीचे केंद्र म्हणून संपूर्ण भारतामध्ये निपाणीची ऐतिहासीक नोंद झालेली आहे. त्यामुळे येथील मुन्सिपल हायस्कूलसमोर छोटासा क्रांतीस्तंभ उभारण्यात आला आहे. त्या स्तंभाची पूर्ण निर्मिती व्हावी, या मागणीचे निवेदन बहुजन आणि दलित समाजातर्फे नगराध्यक्ष जयवंत भाटले यांना प्रा. डॉ. अच्युत माने सुधाकर माने व नागरिकांच्या हस्ते देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी म्युनिसिपल हायस्कूलच्या पटांगणावर सन 1938, 1946, 1952 या सालामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक सभा झालेल्या आहेत. निपाणीकरांच्या करीता ही ऐतिहासिक बाब असून 1938 मधील सभेमध्ये म्युनिसिपल हायस्कूलच्या पटांगणावर भारतातील दलित, शोषित, वंचीत समाजाला येथुन पुढे शासनकर्ती जमात बनायची आहे, असा अनमोल क्रांतीकारी संदेश दिला आहे. यामुळे भारतातील दलित, शोषित, वंचीतांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हे निपाणीतील म्युनिसिपल हायस्कूलच्या भव्य पटांगणावरील महामानवाच्या क्रांतीकारी संदेशाने सिध्द केले. निपाणीच्या सभेचा संदेश संपूर्ण भारतातील दलित, शोषित, वंचीतांच्या घराघरामध्ये पोहचलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशाची आठवण संस्मरणीय करण्यासाठी क्रांतीस्तंभ कमिटीच्यावतीने 2016 साली विनंती केल्याने निपाणी नगरपालिकेने 2017 मध्ये क्रांतीस्तंभ उभा केला आहे . निपाणी हे परिवर्तन चळवळीचे ऐतिहासिक केंद्र म्हणून नोंद झालेली आहे. म्युनिसीपल हायस्कूलच्या मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभा झालेले असलेने त्याच ठिकाणी हा स्तंभ उभा असलेने आंबेडकरी चळवळीकरीता हा स्तंभ अत्यंत अस्मितेचा आहे. तो स्तंभ शिलालेखासह सुशोभित केलेस परिवर्तनाच्या चळवळीच्या वैभवात भर पडेल. ज्या ठिकाणी डॉ. आंबेडकरांच्या चळवळीच्या ऐतिहासीक घटना घडलेल्या आहेत. ती ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये ऐतिहासीक नोंद घेतली आहे. त्या ठिकाणी ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचे वतीने त्या जागेवर दगडाने क्रांतीस्तंभाची उभारणी केली आहे. शिवाय क्या ठिकाणाच्या संदर्भाचा शिलालेखासह उल्लेख करुन स्तंभाची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे ठिकाणाचे महत्व अधोरेखित करुन गावाचे नांव अजरामर केलेले आहे. म्युनिसीपल हायस्कूलच्या भव्य पटांगणावरुन संपूर्ण भारतातील दलित, शोषित, बहुजन, वंचितांना दिलेला शासन कर्ती जमात झाली पाहिजे, या क्रांतीकारी संदेशाचा शिलालेखासह काळ्या दगडातून क्रांतीस्तंभ उभा करुन निपाणीचे नांव परिवर्तनाच्या चळवळीमध्ये अजरामर करावे. क्रांतीस्तंभाची पूणर्निमिती केल्यास बहुजन वंचित दलित शोषित समाजाला प्रेरणा मिळणार आहे.
निवेदनावर सर्जेराव हेगडे, आरेश सनदी, दीपक माळगे, गणू गोसावी, दीपक गिरी, मयूर माने, मधुकर पकाले, राजू माने, आराध्या माने, संगीता माने, सचिन लोकरे, बाबासाहेब मुल्ला, विकास लोकरे, सुभाष खोत, संदीप कदम, श्रावण चौगुले, यांच्यासह कार्यकर्त्यांची नावे आहेत.
Check Also
बोरगाव सातबारा वरील वक्फच्या नोंदी अखेर रद्द
Spread the love उत्तम पाटील यांच्या प्रयत्नांना यश; पूर्वीप्रमाणेच मिळणार उतारे निपाणी (वार्ता) : बोरगांव …