बेळगाव : बेळगाव तालुक्यातील नियोजित रिंगरोड हा शेतकऱ्यांना गळफास लावणारा रिंगरोड आहे. हा रिंगरोड झाला तर तालुक्यातील ३२ गावातील बाराशे १२७२ एकर जमीन वाया जाणार आहे. तसेच या ३२ गावातील जमिनीबरोबर आतील गावातील जमिनीलाही भविष्यात मोठा धोका निर्माण होणार आहे. तेव्हा रिंगरोड रद्द करणे हे शेतकऱ्याचे तसेच तालुक्याचे हिताचे आहे..यासाठी मुतगा येथे सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी रास्तारोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये मुचंडी भागातील सर्व शेतकरी बंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, व सरकारला शेतकरी बाणा दाखवावा, असे आवाहन माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले.
मुचंडी येथे शुक्रवार दिनांक 3 रोजी सायंकाळी रास्ता रोको आंदोलनासंदर्भात शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
सुधीर शिरोळे यांनी प्रास्ताविक केले या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी ऍड. सुधीर चव्हाण, भागोजी पाटील, मनोज पावशे, माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर, आर. आय. पाटील उपस्थित होते.
यावेळी भागोजी पाटील म्हणाले की, रिंगरोड रद्द करण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने रस्त्यावरची लढाई लढतच आहे, या लढाई बरोबरच शेतकऱ्यांनी न्यायालय लढाईसाठी जी कोर्टात याचिका दाखल केली आहे, त्याच्या सुनावणी शेतकऱ्यांनी त्या तारखेला योग्य वेळेत हजर राहून आपली जमीन देणार नाही असे कोर्टाला ठणकावून सांगितले पाहिजे. जर तुम्ही त्या तारखेला वेळेत उपस्थित राहिला नाही तर कोर्ट तुमचा वेगळा अर्थ जाणून घेईल, यासाठी सर्व शेतकऱ्यांनी वेळेत तारखेला हजर राहणे जरुरीचे आहे. हा लढा जास्त वेळ लढला जाणार आहे,यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या लढ्यामध्ये सातत्य ठेवले पाहिजे व प्रत्येक आंदोलनावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणे गरजेचे आहे. या लढ्याचाच एक भाग म्हणून सोमवार दिनांक 6 रोजी मुतगा रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी या भागातील सर्व शेतकऱ्यांनी आपली जनावरे, कुटुंबासह आपल्या गावामध्ये वार पाडून या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणे गरजेचे आहे. तरच हा रिंगरोड रद्द होईल असे म्हणाले.
यावेळी ऍड. सुधीर चव्हाण, रामचंद्र मोदगेकर, मनोज पावशे, आर. आय. पाटील, मारुती कुंडेकर, सुधीर शिरोळे यांनी आपले विचार व्यक्त केले. या बैठकीला मुतगा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta