बेळगाव : बेळगावमध्ये अनेक दुधाचे ब्रँड आपल्या मालाचे विक्री करत असतात. महाराष्ट्रातून येणाऱ्या दुधाबरोबरच कर्नाटकातील अनेक ब्रँड अनेक नावाने बेळगावात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करतात. कर्नाटक मिल्क फेडरेशनतर्फे नंदिनी या ब्रँडने दूध विक्री करीत होते. कर्नाटक मिल्क फेडरेशन अनेक फॅट आणि एसएमएसचे नंदिनी ब्रँड अंतर्गत दुधाची विक्री करत आहे. कर्नाटक फेडरेशनने अनेक वेळा कर्नाटक सरकारकडे दूध दरवाढी संबंधित विचारणा केली होती परंतु नजीकच्या निवडणुका लक्षात घेऊन सरकार दूध दरवाढ करण्यास तयार नव्हते. या पार्श्वभूमीवर बेळगाव मध्ये नंदिनी दुधाचे पूर्वी 1000 व 500 मिली अशा स्वरूपात पाकीट दुधाची विक्री केली जात असे त्या मापात एक फेब्रुवारीपासून ग्राहक वितरक यांना कोणतीही कल्पना न देता कर्नाटक मिल्क फेडरेशनने शंभर मिलीची घट करत नंदिनी या दुधाच्या मापात कपात केली आहे. त्यामुळे एक तारखेपासून प्रति लिटर पाच ते सहा रुपये लिटरला छुपी दरवाढ करण्यात झाली. नंदिनी दुधा मागे प्रति लिटर 100ml दुधाची कपात करण्यात आली आहे परंतु दर मात्र तेच ठेवण्यात आल्यामुळे हा ग्राहकांना फटका बसत आहे. त्याचबरोबर याबद्दल ग्राहकाला कोणतीही पूर्व सूचना दिलेली नाही त्यामुळे ग्राहकांच्या संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ही सरकारी संस्था असल्याकारणाने असे करणे गैर आहे. दरवाढीबाबत किंवा दूध कपाती बाबत ग्राहकाला कळविण्यात आले पाहिजे. जर कर्नाटक मिल्क फेडरेशनला दुधाचा दर परवडत नव्हता तर त्यांनी याची पूर्वकल्पना ग्राहकाला देणे भाग होते. ग्राहकाला पूर्व सूचना न देता हे करण्यामागचे कारण म्हणजे दुधाची तस्करी असू शकेल कारण कर्नाटक सरकार ग्राहकाला स्वस्त दूध मिळावे म्हणून प्रति लिटरसहा रुपये अनुदान देते. त्यामुळे कर्नाटकाचे नंदिनी दूध स्वस्त ग्राहकापर्यंत पोहोचते. महाराष्ट्रामध्ये या दुधाला जास्त दर मिळतो. त्यामुळे अवैधरित्या महाराष्ट्रात हे दूध पाठवले जाते. त्याचा फटका कर्नाटकातील ग्राहकांना बसत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकाला पूर्व सूचना न देता दुधा मागील कपात करण्याचे कारण असू शकते. व यामागे कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या अधिकाऱ्यांचा हात असू शकतो. याबाबतचा गैरप्रकार उघडकीस आणायला हवा. ग्राहकाला फसवून कोण आपले हात ओले करीत आहे याची चौकशी झालीच पाहिजे. व या प्रकाराबाबत अधिकाऱ्यांनी काय असेल तो खुलासा करायला हवा. याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करून दूध तस्करीत गुंतलेल्या संबंधितांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे, असे मत ग्राहकातून व्यक्त होताना दिसत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta