बेळगाव (वार्ता) : विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे या समस्या त्वरित सोडवण्यात याव्यात यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन छेडून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
सध्या शाळा आणि कॉलेज सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने त्यांना ताटकळत थांबावे लागत आहेत.
तसेच बस पास अद्यापही उपलब्ध करून देण्यात न आल्याने रोज पैसे देऊन बसचा प्रवास करावा लागत आहे. याबाबत अधिकार्यांना कळवून देखील त्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे.
तसेच महाविद्यालयांमध्ये गेल्या वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. ही परिस्थिती यावर्षीही तशीच आहे. महाविद्यालयांमध्ये शिष्यवृत्तीबद्दल विचारले तर उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने आज आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
हिवाळी अधिवेशनावर 580 सीसीटीव्ही तर 10 ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर
Spread the love बेळगाव : सोमवार पासून सुरु होणाऱ्या बेळगाव येथील विधिमंडळ हिवाळी अधिवेशनासाठी …