बेळगाव : बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. त्या अत्याचारांना रोखण्याकरिता भारत सरकारला प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने आज हिंदू जनजागृती समितीच्या वतीने येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात आंदोलन छेडण्यात आले.
बांगलादेशमध्ये सध्या ज्या घटना घडत आहेत. त्यांची संपूर्ण माहिती पुढे येत नाही. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या जी माहिती हाती आली आहे. त्यानुसार बांगलादेशमध्ये जवळपास पंधराशे हिंदूंची घरे जाळण्यात आली आहेत. 12 हून अधिक हिंदूं व्यक्तींच्या कत्तली करण्यात आल्या आहेत. तसेच दोन साधूंना ठार देखील ठार करण्यात आले आहे. तसेच एका बालकाची निर्घृण हत्या करून त्याचे अवयव इतरत्र फेकण्यात आले आहेत. नवरात्रोत्सवाचा पार्श्वभूमीवर बांगलादेशीमधील दुर्गा मातेच्या मुर्त्या तोडण्यात आल्या आहेत. सध्या हिंदू धार्मियांवर बांगलादेशमध्ये प्रकर्षाने रोष पत्करण्यात येत आहे. तेथील सरकारच्या म्हणण्यानुसार हिंदूंना रक्षण देण्यात येत आहे. मात्र याठिकाणी त्या प्रमाणात दंगली सुरूच आहेत.
