कोगनोळी : हलसिद्धनाथ महाराज की जय.. चांगभलच्या गजरात येथील कुर्ली आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ यात्रेला शुक्रवार तारीख 22 रोजी पासून सुरुवात झाली.
सकाळी कुर्ली येथील हालसिद्धनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर पालखी गावातील प्रमुख मार्गावरून आप्पाचीवाडी येथे आल्यावर आप्पाचीवाडी पालखी, कुरली पालखी, अश्व, छत्री सबिना खडक मंदिरात आणण्यात आला. विविध धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर उत्सव मूर्तींची प्रतिष्ठापना करून या यात्रेची सुरुवात करण्यात आली होती.
दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम रात्री ढोल जागर वालंग झाला. शुक्रवार तारीख 22 रोजी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यात्रेला भाविकांनी किरकोळ गर्दी केली होती. मंदिर व परिसरात गर्दी होऊ नये म्हणून निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यात्रेनिमित्त या ठिकाणी खेळणी पाळणे आदीसह अन्य दुकानांना बसण्यास परवानगी दिली नसल्याने या ठिकाणी गर्दी अत्यंत कमी झाली आहे. हालसिद्धनाथ मंदिरामध्ये मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आप्पाचीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रेनिमित्त गावातील गटारी स्वच्छ करून घेण्यात आले आहे. त्याचबरोबर गावातील रस्ते, पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा यासह अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या कामी ग्रामपंचायत अध्यक्षा मंगल पाडेकर, ग्रामपंचायत उपाध्यक्षा उमा कांबळे, ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण पारे, संजय खोत, बिपिन चव्हाण यांचेसह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थांचे सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले.
Check Also
बोरगाव सातबारा वरील वक्फच्या नोंदी अखेर रद्द
Spread the love उत्तम पाटील यांच्या प्रयत्नांना यश; पूर्वीप्रमाणेच मिळणार उतारे निपाणी (वार्ता) : बोरगांव …