बेळगाव : भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. जनतेसमोर महागाई, बेरोजगारी सारखे प्रश्न आ वासून उभे आहेत, असे दक्षिण मतदार संघातील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार सातेरी बेळवटकर यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष परशुराम ढगे आणि ग्रामिण ब्लॉक अध्यक्ष किरण पाटील येळ्ळूर यांच्या वतीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भोजप्पांना हे होते.
यावेळेस राज्यात काँग्रेस निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करेल, असा विश्वास यावेळी काँग्रेस नेते बेळवटकर यांनी व्यक्त केला. भाजपा सरकारच्या आणि स्थानिक आमदारांच्या मनमानी कारभाराला जनता कंटाळली आहे. काँग्रेस कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी व ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर, ग्रामीण, दक्षिण तसेच खानापूर मतदार संघात काँग्रेसचा झेंडा नक्कीच फडकणार. जनता यावेळी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार रमेश गोरल, प्रभावती चावडी- मस्तमर्डी, ॲड. चंद्रहास अणवेकर हे उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta