Monday , September 21 2026
Breaking News

गोकाक शहरात मराठा समाजाच्या विकास कामांसाठी जागा उपलब्ध करून देणार : रमेश जारकीहोळी

Spread the love

 

बेळगाव : गोकाक शहरात मराठा समाजाच्या विकास कामांसाठी 6 गुंठे जागा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा व पत्र दिल्याबद्दल सकल मराठा समाजाने आमदार रमेश जारकीहोळी यांचे अभिनंदन केले.

गोकाक येथे रविवारी झालेल्या कर्नाटक क्षत्रिय मराठा समाजाच्या बैठकीत रमेश जारकीहोळी यांनी ही घोषणा केली व पत्र दिले.

मराठा समाजाचे श्री मंजुनाथ स्वामीजी, अरभावीचे आमदार तथा केएमएफचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी, सकल मराठा समाज संयोजक किरण जाधव, वकील संघाचे राज्य उपाध्यक्ष विनायक मांगलेकर, रमेश जारकीहोळी यांनी गोकाक मराठा समाजाचे नेते जितेंद्र मांगलेकर यांच्या उपस्थितीत पत्र दिले.

आमदार रमेश जारकीहोळी यांनी मराठा समाजाच्या विकासाकरिता दिलेल्या योगदानाबद्दल श्री मंजुनाथ स्वामीजी व सकल मराठा समाज संयोजक किरण जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले. रमेश जारकीहोळी हे मराठा समाजाच्या हितासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याबद्दल किरण जाधव यांनी त्यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *