येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या साहित्यिक, सामाजिक, पत्रकारिता, शिक्षण, क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. रविवारी (ता. १९) होणाऱ्या १८ व्या साहित्य संमेलनात पुरस्कार वितरण होणार आहे. राष्ट्रवीरकार शामराव देसाई साहित्यिक पुरस्कार डॉ. रोहिदास जाधव (पुणे), मारुती पाटील (पेंटर) सामाजिक पुरस्कार श्रीमाता सोसायटीचे संस्थापक मनोहर देसाई, रमाबाई आंबेडकर महिला सामाजिक पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या ऍड. वर्षा देशपांडे (सातारा), कृष्णा मुचंडी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ‘दै. ‘सकाळ’ बेळगावचे मुख्य बातमीदार मल्लिकार्जुन मुगळी, गावडोजी पाटील गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. पी. कानशिडे, मारुती कुगजी आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार भरतेश हायस्कूलचे क्रीडाशिक्षक प्रदीप जुवेकर यांना दिला जाणार आहे. गंगुबाई गुरव विशेष साहित्य पुरस्काराचे नाव संमेलनस्थळी जाहीर करण्यात येईल. येळ्ळुरवाडीतील परशराम पाटील यांना कृषी पुरस्कार तर सैनिक सोसायटीचे अध्यक्ष बाबूराव मुरकुटे, हेस्कॉमचे कर्मचारी यल्लाप्पा गौंडाडकर, हस्तचित्रकार जयपाल पुजारी यांना विशेष सेवा पुरस्कार दिला जाणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta