बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बेळगाव यांच्यावतीने दरवर्षी प्रत्येक गावोगावी होणारा मोहिमेचा भंडारा प्रथमच एकत्रितपणे आयोजिण्यात आला आहे. गुरुवर्य संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण व शहर विभागाचा संयुक्त मोहीम भंडारा बुधवार दि. १५ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता कपिलेश्वर मंदिरा शेजारी असलेल्या गणपती विसर्जन तलाव परिसरात आयोजित करण्यात आला आहे. तरी बेळगाव तालुक्यातील सर्व धारकऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्येष्ठ धारकऱ्यांचे व्याख्यान, बलिदान मास, प्रबोधन कार्यक्रम, मोहिमेचा अनुभव अशापद्धतीची कार्यक्रमाची रूपरेषा असून स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमात पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डॉ. सुजित निलेगावकर हे ‘धारकरी कसे घडतील’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तरी सर्व धारकऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta