बेळगाव : रामनगर वडरवाडी येथे श्रीमरगाई महिला मंडळाच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमाला एंजल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष मीनाताई बेनके उपस्थित होत्या.
यावेळी त्यांनी येथील महिलांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांना आपण समाजात कशाप्रकारे पुढे आले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी हळदीकुंकूचे महत्त्व यावेळी महिलांना सांगितले.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात मीनाताई बेनके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन आणि सावित्रीबाई फोटो पूजन कार्यक्रमाला चालना देण्यात आली.
यावेळी प्रास्ताविक महिला मंडळाच्या सदस्यांनी केले तर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाला मरगाई महिला मंडळाच्या महिला उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta