बेळगाव : शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे मात्र येथील शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. बेळगांव व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर शेती व्यवसाय करतात अनेकांचे उपजीविकेचे साधनही शेती आहे. परंतु शेतीसाठी लागणाऱ्या सोयी सुविधा शेतकऱ्यांना मिळत नाहीत. पूर्वी शेतकऱ्यांना विद्युत पुरवठ्यात व्यत्यय येत होता. रात्रीच्या वेळी शेतात विद्युत पुरवठा होत असे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी सोडण्यासाठी रात्री अपरात्री जावे लागत असे. परंतु आता तसे होणार नाही. सरकारकडून आदेश आल्यामुळे मुख्य अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विजेमुळे होणाऱ्या समस्या सोडविणार आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या बोअर, विहीरी आहेत त्यांना विद्युत पुरवठा व्यवस्थितरित्या दिला आहे. तसेच त्यांच्या इतर समस्या जसे की मोडकळीस आलेले विद्युत खांब, शेतात असलेल्या टीसी रस्त्यालगत आणून बसविणे जेणेकरून पावसाळ्यात टीसी खराब झाल्यास रिपेअर करण्यासाठी पाण्यातून किंव्हा चिखलातून वायरमानला जायला लागू नये. ज्या शेतकऱ्यांची पंपसेटचे मीटर जळालेली आहे ती तात्काळ बदलून देणे, ज्या विद्युत वाहिन्या जुन्या आहेत त्या बदलून देणे अश्या अनेक समस्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या आहेत तर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
रेल्वे स्टेशन समोरील मुख्य कार्यालयाचे मुख्य एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर श्री. मंजुनाथ आप्पणवर साहेब, तसेच असिस्टंट एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर श्री. विनोद करुर साहेब, शाखा अधिकारी जगदीश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामे पावसाळ्याआधी पूर्ण करून देण्यात येतील असे ठोस आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.
यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना असेही सांगितले की, यापुढे कोणतीही समस्या असेल तर थेट आमच्याशी संपर्क साधावा व शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी सोयीचे होईल त्या ठिकाणी बैठक घेऊन त्यांच्या समस्यांचे निवारण करून देण्यात येईल.
यावेळी शेतकरी नेते राजू मरवे, भोमेश बिर्जे, महादेव कुगजी, यल्लाप्पा तारिहाळकर, तानाजी हलगेकर, महेश होसुरकर यांच्यासह अनेक शेतकरी हजर होते.
Belgaum Varta Belgaum Varta