बेळगाव : नेहरूनगर येथे नेहरूनगर रहिवाशांच्यावतीने विविध मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
नेहरूनगर येथील बसवाण्णा महादेव देवस्थान कमिटी, बसवाण्णा महादेव को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, नेहरुनगर शिवजयंती उत्सव मंडळ, सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आणि नेहरू नगर महिला मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
भाजप ओबीसी युवा मोर्चा राज्य सचिव किरण जाधव यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केल्यानंतर दीप प्रज्वलित करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल व भेटवस्तू देऊन किरण जाधव यांचा सन्मान करण्यात आला.
यानंतर नूतन बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर, भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, प्रभाग क्रमांक 6 चे नवनिर्वाचित नगरसेवक संतोष पेडणेकर, प्रभाग क्रमांक 7 चे नगरसेवक शंकर पाटील, प्रभाग क्रमांक 33च्या नगरसेविका रश्मी पाटील या मान्यवरांचा, सत्कार सोहळा आयोजन समितीच्यावतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी नेहरूनगर भागातील पंच मंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
पंचमसाली आरक्षणासाठी १८ रोजी ‘चलो बेंगळुरू’ची हाक : बसवजय मृत्युंजय स्वामी
Spread the love बेळगाव : गेल्या वर्षभरापासून पंचमसाली समाजाचे २ए आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु …