येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची दुसरी बैठक रविवार ता. (24) रोजी सकाळी 11 वाजता श्री शिवाजी विद्यालयच्या सभागृहात, मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी उपस्थित अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. त्यानंतर सर्वांच्या विचारांती चर्चा करून येळ्ळूरमधील व नोकरीनिमित्त बाहेर गावी असलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना संपर्क करण्यासाठी म्हणून, विभागवार संपर्कासाठी, माजी विद्यार्थ्यांची निवड करून विभागवार कमिट्या स्थापन करण्यात आल्या. त्या कमिटीच्या माध्यमातून इतर सर्व माजी विद्यार्थ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर नियोजित सत्कार समारंभाची तारीख निश्चित करणे व विकास खर्चाबाबत साधक-बाधक चर्चा करण्यात आली. पुढील रविवारची बैठक गावामध्ये भात सुगी कामकाज सुरू असल्याने रविवारी सायंकाळी 6 -00 वाजता घेण्याचे ठरविण्यात आले. पुढील बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांची निवडही करण्याचे ठरविण्यात आले. कार्यक्रमाला सर्व माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य अपेक्षित असून कार्यक्रम सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांच्या विचारातून व्यवस्थितरित्या पार पाडण्याचे ठरविण्यात आले. श्री शिवाजी विद्यालयातील सर्व सेवानिवृत्त माजी शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचे ठरविण्यात आले. त्याचबरोबर विद्यालयाचा विकासही करण्याचे ठरवण्यात आले. बैठकीला माजी विद्यार्थी डी. जी. पाटील, परशराम मोटराचे, दूधाप्पा बागेवाडी, रामलिंग कानशिडे, डॉ. तानाजी पावले, मल्लाप्पा कुंडेकर, जोतिबा चौगुले, विष्णू मासेकर, गंगाधर पाटील, माणिक उघाडे, हणमंत पाटील, प्रा. सी. एम. गोरल, सतीश पाटील, प्रकाश नंदिहळ्ळी, सुनिल अतिवाडकर, दीपक धामणेकर, संजय गोरल , विष्णू मासेकर, हणमंत कुगजी, प्रशांत सुतार, कल्लाप्पा कंग्राळकर, अशोक कोलकार, उत्तम चिट्टी, मोहन पाटील, संजय मजूकर, अमोल जाधव आदी यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक संजय मजूकर यांनी केले. तर आभार प्रा. सी. एम. गोरल यांनी मानले.
Check Also
उद्यापासून सार्वजनिक वाचनालयाची बॅ. नाथ पै व्याख्यानमाला
Spread the love बेळगाव : 176 वर्षाची परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालय, या संस्थेच्यावतीने आयोजित …