Friday , December 12 2025
Breaking News

वडगाव परिसरात पाण्याची तीव्र टंचाई; रमाकांत कोंडुस्करांकडून टँकरची व्यवस्था

Spread the love

 

बेळगाव : वडगाव परिसरात पाण्याची समस्या भेडसावत आहे. मागील पंधरा दिवसापासून नळाला पाणी येत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी स्वखर्चाने पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला आहे.
एल अँड टी कंपनीच्या बेजबाबदारपणाचा फटका नेहमीच बेळगावकराना बसत आहे. गळती निवारण्यासाठी बेळगांव शहर व उपनगरात काही काळ पाणी पुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला होता मात्र वडगाव परिसरात मागील पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही त्यामुळे येथील नागरिकांना प्रचंड प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गृहिणींची तारांबळ उडाली आहे. वारंवार तक्रार करून देखील या भागातील आमदार व नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याचे समजताच महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी वडगाव परिसरात पाण्याचे टँकर पाठवून या भागातील जनतेची तहान भागविली आहे. त्यामुळे महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला कार्यकर्त्या शिवानी पाटील, सुमित मोरे, बाबू नावगेकर आदी युवक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आई माझी गुरु, आई कल्पतरू, सौख्याच्या सागरु!

Spread the love  आमची आई 1 डिसेंबर 2025 ला आमच्यातून निघून गेली. आज तिचा बारावा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *