
बेळगाव : महिला दिनाचे औचित्य साधून एंजल फाउंडेशन आणि टिळकवाडी येथील सिद्धी महिला मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सदर रक्तदान शिबिर बिम्स परिसरात पार पडले. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानत महिला दिनी एंजल फाउंडेशनने रक्तदान शिबिर पार पाडले. यावेळी जवळपास 50 हुन अधिक महिलांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले. आणि संकलित केलेले रक्त बिम्स रुग्णालयाला देऊ केले.
यावेळी या रक्तदान शिबिरात एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी देखील रक्तदान करून रक्तदान किती महत्त्वाचे आहे याबद्दल सांगितले. आणि इतर महिलांना रक्तदान करण्यास प्रोत्साहन दिले. त्यानुसार उपस्थित असलेल्या महिलांनी देखील रक्तदान केले.
Belgaum Varta Belgaum Varta