Saturday , March 7 2026
Breaking News

मजदूर नवनिर्माण संघाच्या वतीने येळ्ळूरच्या रोहयो अंतर्गत काम करणाऱ्या महिलांसोबत जागतिक महिला दिनाचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कष्टकरी कामगारांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडणाऱ्या ‘मजदूर नवनिर्माण संघाच्या’ माध्यमातून येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या सोबत महिला दिनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्त्रीरोगतज्ञ डाॅ. सुरेखा पोटे, येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, प्रभारी पीडिओ सदानंद मराठे व राज्यस्तरीय ग्रामीण महिला वेटलिफ्टर नकुशा (दिशा) पाटील लाभले होते. येळ्ळूरच्या महिला कामगारांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी डॉ. सुरेखा पोटे यांनी महिला दिनाचा इतिहास सांगत व महत्त्व विशद केले. अध्यक्ष सतीश पाटील यांनी महिलांना शुभेच्छा देत सरकारी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. उपस्थित रोहयोच्या महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा येळ्ळूर पंचायतीच्या वतीने पीडिओ सदानंद मराठेनी दिल्या. व उदयोन्मुख युवा वेटलिफ्टर नकुशा (दिशा) पाटील यांनी महिलांशी बोली भाषेत संवाद साधत त्यांच्या मुलींना फक्त चुल आणि मुल सांभाळण्यासाठी तयार न करता स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तयार करा असे सांगितले. ‘मजदूर नवनिर्माण संघाच्या’ वतीने राहुल पाटील यांनी प्रथमतः समस्त महिला वर्गाला वंदन करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांची ओळख व आभार मानले. कार्यक्रमानंतर सर्व महिलांना पंचायतीच्या वतीने चहा व बिस्किटे दिली. या कार्यक्रमाला कौस्तुभ पोटे, निर्मला बरसाकाळे, गुरुदेवी रामदुर्ग, शोभा कुंडेकर, कविता गोरल, रेश्मा कुरंगी, सुमन गोरल व ज्योती मेलगे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *