बेळगाव : येळ्ळूर येथील श्री ब्रह्मलिंग मल्टीपर्पज को-ऑफ. सोसायटीच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिन व हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात
साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक श्री. गोविंद सिद्धाप्पा कालसेकर, चेअरमन श्री. जोतिबा गोविंद कालसेकर, व्हाईस चेअरमन श्री. प्रकाश सायनेकर तसेच कार्यक्रमाला महिला प्रमुख पाहुण्या म्हणून ग्रामपंचायत उपाध्यक्षा सौ. लक्ष्मी मासेकर, सौ. राजकुवर तानाजी पावले, रूपा पुण्यानावर, लक्ष्मी रजपूत, प्रमुख वक्त्या म्हणून श्री शिवाजी विद्यालयाच्या सहशिक्षिका विद्या पाटील, सुमन गोपाळ कंग्राळकर, सोसायटीच्या संचालिका व नूतन ग्रामपंचायत सदस्या सौ. शांता मासेकर व बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या फोटो पूजनाने करण्यात आली. उपस्थित सर्व महिला प्रमुख पाहुण्यांचे सोसायटीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सोसायटीचे संस्थापक श्री. गोविंद सिद्धाप्पा कालसेकर व उपस्थित महिला प्रमुख पाहुण्यांनी महिला दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ. विद्या विष्णू पाटील यांनी सावित्रीबाई फुले, महिलांचे हक्क व महिला सबलीकरण विषयी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला सोसायटीचे संचालक श्री. नेताजी गोरल, श्री. बाळासाहेब पावले, श्री. बाळासाहेब कंग्राळकर, श्री. पुंडलिक कंग्राळकर संजय मासेकर, विष्णू मासेकर, संजय हूव्वानावर व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना सौ. सुनीता मेलगे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अपेक्षा जोतिबा कालसेकर व आभार प्रदर्शन काजल कणबरकर यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिला सदस्यांचे सोसायटीच्यावतीने भेटू देऊन सन्मान करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta