
बेळगाव : शाहूनगर येथील श्री मल्लिकार्जुन वृद्धाश्रममध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एंजल फाउंडेशनच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला.
वृद्धाश्रमातील आजींच्या हस्ते केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला. तसेच आश्रमातील आजींना बिस्कीट, पुलावचे वाटप सुद्धा करण्यात आले.
एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांच्या हस्ते वृद्धाश्रममधील आजींचा शाल घालून सन्मान देखील करण्यात आला.
याप्रसंगी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके, मिलन पवार, सविता कर्डि, व एंजल फाउंडेशनच्या सदस्या उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta