बेळगाव : “आजचा विद्यार्थी हा अतिशय भाग्यवान आहे, त्याला जीवनात जशा शिकण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत तशाच त्याला नोकरीचेही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळेमध्ये विकसित करण्यात आलेले ज्ञान, कौशल्य, नैतिक मूल्य आणि चांगल्या सवयी आयुष्यभर जोपासाव्यात” असे विचार जी एस एस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री. एस वाय प्रभू सर यांनी बोलताना व्यक्त केले. गुणविकास प्रतिष्ठान संचलित भाग्यनगर येथील मुक्तांगण विद्यालयाच्या दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एस वाय प्रभू सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा व्यक्त केल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. ए एल गुरव हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. दयानंद तावरी यांनी उपस्थितांचे स्वागत केल्यावर पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित असलेले संस्थेचे संचालक श्री. अनंत लाड यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे महत्व समजावून सांगितले. वेळेचा सदुपयोग कसा करावा याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
परीक्षेची तयारी कशी करावी याबाबतचे मार्गदर्शन प्राचार्य सविता जे के यांनी केले. वैष्णवी गावडे व विघ्नेश सनदी या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून ए एल गुरव यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष एस एम जाधव, सेक्रेटरी दिगंबर राउळ, सहसेक्रेटरी बी एल सायनेकर, संचालक अनंत लाड व डी सी सुतार आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार नवेली गौंडाडकर या विद्यार्थीनीने केले तर सूत्रसंचालन दिव्या प्रजापती या विद्यार्थीनीने केले.
Belgaum Varta Belgaum Varta