Monday , April 22 2024
Breaking News

बेळगावच्या जलतरणपटूंचे राष्ट्रीय स्पर्धेत सुयश

Spread the love

बेळगाव : स्विमर्स क्लब बेळगावच्या अद्वैत दळवी आणि वेदांत मिसाळे या दोन उदयोन्मुख जलतरणपटूंनी बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय पातळीवरील 37 व्या उपकनिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
सदर राष्ट्रीय स्पर्धेच्या 10 वर्षाखालील मुलांच्या पाचव्या गटात अद्वैत दळवी याने 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात तृतीय क्रमांक मिळवताना कर्नाटकला कांस्य पदक मिळवून दिले. वेदांत मिसाळे यांने देखील स्पर्धेच्या पाचव्या गटातील 100 मीटर बटरफ्लाय स्ट्रोक प्रकारात पाचवा क्रमांक मिळवला.
बेंगलोरच्या बसवणगुडी क्वेटिक सेंटर येथे गेल्या 19 ते 23 ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या या उपकनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील सुमारे 1500 जलतरणपटुंनी भाग घेतला होता.
अद्वैत दळवी आणि वेदांत मिसाळे हे दोघेही केएलईएस सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात पोहण्याचा सराव करतात.
त्यांना उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर यांचे मार्गदर्शन तसेच नितीश कडुचकर, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके आणि गोवर्धन काकतकर यांचे प्रशिक्षण लाभत आहे. त्याचप्रमाणे डॉ. प्रभाकर कोरे, डॉ. विवेक सावजी, रो. अविनाश पोतदार व सुधीर कुसाण यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

म. ए. समितीचे उमेदवार महादेव पाटील यांचा शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल

Spread the love  बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *