Saturday , December 14 2024
Breaking News

टेनिसपटू लिएंडर पेस तृणमूलमध्ये, ममतांच्या उपस्थितीत गोव्यात पक्ष प्रवेश

Spread the love

पणजी : भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस याने राजकारणात पदार्पण केले आहे. त्याने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. लिएंडरने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत गोव्यात पक्ष प्रवेश केला. तृणमूल काँग्रेसने ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. आम्हाला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की लिएंडर पेस आज तृणमूलमध्ये सामील झाले. 2014 पासून आम्ही वाट पाहत असलेल्या लोकशाहीची पहाट देशातील प्रत्येक व्यक्तीला दिसेल याची आम्हाला खात्री आहे, असे तृणमूलने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर म्हटले आहे.
लिएंडरने टीएमसीचा झेंडा हातात घेऊन राजकीय इनिंगला सुरुवात केली. विशेष म्हणजे लिएंडरने टीएमसीमध्ये प्रवेश करत आगामी निवडणुकीत उतरणार असल्याचे संकेत दिलेत. याआधी ममता बॅनर्जी यांनी गोव्यात बोलताना, आपला एकता आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असल्याचे म्हटले होते. पश्चिम बंगाल प्रमाणे गोवादेखील माझी भूमी असल्याचे त्यांनी नमूद केले होते. 48 वर्षीय लिएंडरला पद्मश्री, पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले आहे. लिएंडरने ऑलिम्पिकमध्ये टेनिस पुरुष एकेरीत भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे. 18 वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन, 7 वेळा ऑलिम्पियन अशी त्याची टेनिस कारकिर्द राहिली आहे.
नफिसा अली यांचाही तृणमूलमध्ये प्रवेश
लिएंडर पेस यांच्यासह अभिनेत्री नफिसा अली आणि गोव्यातील मृणालिनी देशप्रभू यांनी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

अमित शाह घेणार शरद पवार यांची भेट

Spread the love  मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *