बेळगाव : मंगाईनगर, वडगाव येथील नागरी समस्यांच्या निवारणार्थ श्री मंगाईनगर रहिवासी संघाची स्थापना करण्यात आली असून संघाच्या अध्यक्षपदी बंडू केरवाडकर यांची निवड करण्यात आली आहे.
मंगाईनगर वडगाव येथील रहिवाशांची बैठक काल शुक्रवारी सोमेश्वरी हॉल येथे पार पडली. सदर बैठकीत ज्येष्ठ पंच मंडळी, युवक आणि नागरिकांमध्ये श्री मंगाईनगर मधील विविध नागरी समस्यांचे निवारण करण्यासाठी रहिवासी संघाची स्थापना करण्याबद्दल चर्चा झाली. सदर चर्चेअंती सर्वानुमते श्री मंगाईनगर रहिवासी संघ स्थापनेचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे एकमताने श्री मंगाईनगर रहिवासी संघाची कार्यकारणीही निवडण्यात आली, ती पुढील प्रमाणे आहे.
अध्यक्ष -बंडू केरवाडकर, उपाध्यक्ष -किरण पाटील, कार्याध्यक्ष -श्रीधर बिर्जे, उपकार्याध्यक्ष -विक्रम खंडागळे, सेक्रेटरी -सागर पाटील, उपसेक्रेटरी -राहुल पाटील, खजिनदार -प्रशांत हणगोजी, उपखजिनदार -समीर रेमाणाचे. याव्यतिरिक्त इतर 25 जणांची ज्येष्ठ नागरिक पंच कमिटी नेमण्यात आली. प्रवीण होसुर, यश पवार, विनायक अर्कसाली, निलेश केरवाडकर, शुभम पवार, अनिकेत नंदगुडकर, राकेश कडोलकर, सुमित उचगावकर, प्रथमेश धामणेकर, संतोष शेट, जगदीश अर्कसाली, यल्लाप्पा सावंत, गंगाराम माचिक, आनंद दड्डीकर, संकेत धामणकर, ज्योतिबा छत्रे, राहुल तरळेकर, अतुल सांबरेकर, चांगदेव धामणेकर, गजानन खमकारहट्टी, अनिल हुंदरे, बापू गोंधळी, रमणराव हजारे, सदानंद लोकरी, प्रसाद पोटे, चेतन मास्तमर्डी, बसवराज अक्कतंगीहराळ आदींसह बहुसंख्य नागरिक बैठकीला हजर होते.
Belgaum Varta Belgaum Varta