बेळगाव : शहरात दुचाकीवरून बेकायदेशीररित्या नेण्यात येत असलेला दारूचा साठा अबकारी खात्याच्या पथकाने जप्त करून एकाला अटक केल्याची घटना काल रविवारी दुपारी किर्लोस्कर रोड नजीक घडली.
मनोज राम भोगण असे अटक केलेल्या आरोपीचे नांव असून त्याच्याकडून दुचाकी वाहनासह 11.700 लिटर दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. बेळगाव मुख्यालयाचे अबकारी अप्पर आयुक्त, बेळगाव विभागाचे जंटी आयुक्त आणि उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी खात्याच्या पथकाने काल रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास शहरातील किर्लोस्कर रोड नजीक ही कारवाई केली. याप्रकरणी अबकारी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta