बेळगाव : येथील सुवर्ण विधानसौध पश्चिम गेटसमोरील आवारात आज मंगळवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बी.आर. आंबेडकर, वीरराणी कित्तूर चन्नम्मा आणि संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
बेळगाव पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाप्रसंगी सुवर्ण विधानसभा प्रांगणात पुतळ्यांच्या कोनशीला अनावरण सोहळा पार पडला होता. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यात दोन कोटी 55 लाख रुपये खर्च करून तीन महापुरुषांच्या पुतळ्यांचे निर्मिती करण्यात आली. त्या पुतळ्यांचे आज अनावरण करण्यात आले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी, विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सी.सी. पाटील, मंत्री शशिकला जोल्ले, शंकर पाटील मुनेनाकोप्प, मुरुगेश निराणी, आदिजांबव विकास महामंडळाचे अध्यक्ष दुर्योधन ऐहोळे, तांडा विकास महामंडळाचे अध्यक्ष पी.राजीव, आमदार अनिल बेनके, अभय पाटील, गोविंद यादव, डॉ. , महादेवप्पा यादवाड, विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी, प्रकाश हुक्केरी आदी उपस्थित होते.