बेळगाव : क्रिकेट सारख्या खेळामुळे तरुणांनी आपला आवडता छंद जोपासावा तसेच आपले शरीरही सुदृढ ठेवावे. अशा क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपली एकी मजबूत ठेवावी व आपला सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे. तसेच युवकांनी सीमाभागावर जो अन्याय होत आहे ते अन्यायाच्या विरोधात उठून कार्य केले पाहिजे व आपली मातृभाषा टिकली पाहिजे, असे विचार महाराष्ट्र एकिकरण समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी केले.
बोकनूर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बालाजी पाटील उपस्थित होते.
कृष्णा पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपस्थिताचे स्वागत महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते नारायण सांगावकर यांनी केले. गणेश प्रतिमा पूजन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते ऍड. सुधीर चव्हाण यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन डॉ. नितीन राजवगोळकर यांनी केले. यष्टी पूजन आर. आय. पाटील यांनी केले. क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आर. एम. चौगुले यांनी केले. यावेळी आंबेवाडी ग्रामपंचायतचे अध्यक्ष चेतन पाटील, नितीन राजग झळकत, ऍड. सुधीर चव्हाण, आर. आय. पाटील, नारायण सांगावकर, यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी तालुका पंचायत सदस्य सुरेश राजूकर, एन के कालकुर्दीकर, नवनाथ खामकर, दीपक पावशे, मनोहर संताजी, ग्रामपंचायत सदस्य गुंडू सुतार, पुंडलिक पावशे, पी एस पाटील, कृष्णा शट्टू पाटील, रामा पाटील, तुळसाप्पा गोंजारे, मनोहर कांबळे, भरमा सांगावकर व बोकनूर ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta