Saturday , March 7 2026
Breaking News

विधानसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवार यांनी घेतला आढावा

Spread the love

 

मुंबई : कर्नाटकात विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांबरोबरच सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हालचालींवर आपली बारीक नजर आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आपल्या संपर्कात आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल, याचा मला विश्वास आहे. त्याचबरोबर प्रत्येक मतदारसंघात समितीचा एकच उमेदवार जाहीर केल्यास, विजय निश्चित आहे, असा विश्वास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी इंजिनिअरिंग सेलचे निमंत्रक अमित देसाई यांनी आज मंगळवारी मुंबई येथील सिल्वर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी आम्ही देसाई यांनी, बेळगाव सीमाभागातील बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर या चार मतदारसंघातील निवडणुकात संदर्भात अहवाल सादर केला. या अहवालात मागील तीन निवडणुकांची सविस्तर माहिती, प्रत्येक वेळच्या निवडणुकीत झालेले मतदान, सध्याचे मतदान,यावेळी समितीच्या वतीने इच्छुक असलेल्या उमेदवारांची माहिती देण्यात आली.
सदर अहवाल पाहिल्यानंतर शरद पवार यांनी म. ए. समिती वतीने प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार देण्याची ग्वाही देण्यात आली आहे. एकजुटीतून समिती उमेदवारांचा विजय निश्चित आहे. उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल असा विश्वास आहे. प्रसंगी आपण मार्गदर्शनासही तयार असल्याचे पवार यांनी बोलून दाखवले असल्याचे अमित देसाई यांनी सांगितले आहे.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *