बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदार संघासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडे इच्छुक म्हणून निलजी येथील रहिवासी माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र चुडामणी मोदगेकर यांनी अर्ज केला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते ऍड. राजाभाऊ पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, चिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी अर्जाचा स्वीकार केला आहे. गुरुवार दिनांक 6 रोजी कॉलेज रोड बेळगाव येथील तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात त्यांनी अर्ज केला आहे. यावेळी सुनील अष्टेकर, गोपाळ पाटील, नारायण गोमानाचे, रमेश मोदगेकर, ऍड. सुधीर चव्हाण, वाय. जी. बिराजदार, बी. जी. गाडेकर, बी. डी. मोहनगेकर, माजी एपीएमसी सदस्य आर. के. पाटील, किरण मोदगेकर, संजय पाटील, सोमनाथ भेकणे, दीपक पावशे, बी. एस. पाटील, कृष्णा पाटील, सुरज मोदगेकर, अमोल चौगुले, गंगाराम निलजगी, आदी म. ए. समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta