बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी समितीचे इच्छुक उमेदवार रमाकांत दादा कोंडुस्कर यांना विविध स्तरातून पाठिंबा दिसून येत आहे.
रमाकांत कोंडुस्कर हे निर्भीड व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. रमाकांत दादा यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यामुळे ते सर्वसामान्यांतून रमाकांत कोंडुस्कर यांच्या नावाला पसंती मिळत आहे. विविध भागातून त्यांना जनतेचा जाहीर पाठिंबा मिळत आहे. अनगोळ वासीयांनी आज त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. अनगोळ भागातील नागरिकांनी तसेच वड्डर समाज व बजंत्री समाजाने देखील रमाकांत दादा कोंडुस्कर यांना आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.
दक्षिण मतदारसंघात राष्ट्रीय पक्षाला टक्कर देण्यासाठी तगडा उमेदवार देणे गरजेचे आहे. रमाकांत कोंडुस्कर यांचे संघटन कौशल्य व समाजकार्य करण्याची पध्दत पाहता महाराष्ट्र एकीकरण समितीने निर्विवादपणे रमाकांत कोंडुस्कर यांनाच समितीची अधिकृत उमेदवारी घोषित करावी, अशी मागणी समाजाच्या विविध स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta