Wednesday , December 10 2025
Breaking News

एकजुटीने विधानसभेवर भगवा फडकवूया : आर. एम. चौगुले

Spread the love

 

बेळगाव : अधिकृत उमेदवार म्हणून निवडल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. निवडणुकीत निवडून आलो तरी मी सामान्य कार्यकर्ताच राहणार असून माझी मायबाप मराठी जनताच लोकप्रतिनिधी असणार आहे. आपण सर्वांनी एकीच्या माध्यमातून कर्नाटक विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे, असे बेळगाव ग्रामीण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांनी स्पष्ट केले.

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निवड समितीने आज बुधवारी आर. एम. चौगुले यांची बेळगाव ग्रामीणमधील समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवड केली. या निवडीनंतर आर. एम. चौगुले आपली प्रतिक्रिया व्यक्त करत होते.

ते म्हणाले की, बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील म. ए. समितीच्या उमेदवारीसाठी आम्ही पाच जण इच्छुक होतो. आज उमेदवार निवडीची प्रक्रिया अतिशय सुरळीत पार पडली.

त्यामध्ये माझी बहुमताने उमेदवार म्हणून निवड केल्याबद्दल सर्वप्रथम मी समस्त सीमावासीय मराठी बांधवांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे निवड समितीचे सर्व सदस्य, तालुका म. ए. समितीचे सर्व ज्येष्ठ नेते आणि सर्व मार्गदर्शकांचा मी आभारी आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळेच आज माझी निवड झाली आहे असे सांगून आता यानंतर आजपासूनच आम्ही आमच्या प्रचार कार्याचा शुभारंभ करत आहोत. तत्पूर्वी सर्वप्रथम छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करून मी त्यांचे आशीर्वाद घेणार आहे. त्यानंतर तालुक्यातील गावे, खेड्यापाड्यांमध्ये प्रचाराला सुरुवात होईल, अशी माहिती चौगुले यांनी दिली.

मला जो हा उमेदवारीचा कौल मिळाला आहे तो सीमा भागातील समस्त मराठी भाषिकांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे निवडून आलो तरी मी सामान्य कार्यकर्ताच राहणार असून माझी ही मायबाप मराठी जनताच लोकप्रतिनिधी असणार आहे. थोडक्यात आपण सर्वजण एक आहोत. या एकीच्या माध्यमातून आपण कर्नाटक विधान सभेत भगवा फडकवायचा आहे. तेंव्हा आज जसा मला पाठिंबा दिला तसाच संपूर्ण पाठिंबा येत्या निवडणुकीत प्रत्येक गावागावातील जनता मला देईल असा विश्वास आहे. तेंव्हा आपण सर्वांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा ध्वज विधानसभेवर लावायचा निर्धार करूया, असे आर. एम. चौगुले शेवटी म्हणाले. याप्रसंगी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

मराठा मंदिर येथे आर. एम. चौगुले यांची उमेदवारी जाहीर होताच उपस्थित समिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चौगुले यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. त्याचप्रमाणे यावेळी सर्वांनी छ. शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, बेळगाव-कारवार-निपाणी-बिदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो, आर एम चौगुले यांचा विजय असो, जय महाराष्ट्र अशा घोषणा देऊन मराठा मंदिर परिसर दणाणून सोडला होता.

About Belgaum Varta

Check Also

चर्चच्या बांधकामावरून निर्माण झालेला वादासंदर्भात बेळगाव बिशप यांनी घेतली मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची भेट

Spread the love  बेळगाव : गदग जिल्ह्यातील गजेन्द्रगड येथील होली फॅमिली स्कूल परिसरात पाद्री निवासस्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *