बेळगाव : बहुचर्चित अशा बेळगाव दक्षिण मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीचा अधिकृत उमेदवाराची घोषणा आज होणार आहे. आज मराठा मंदिर येथे निवड कमिटीची बैठक सायंकाळी 5 वाजता बोलाविण्यात आली आहे. निवड कमिटीने दोन दिवस मतदारसंघात फिरून जनमत घेतले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने 87 सदस्यांची निवड कमिटी स्थापन केली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये दक्षिण मतदार संघासाठी माजी आमदार मनोहर किणेकर, रमाकांत कोंडुस्कर, आप्पासाहेब गुरव, शुभम शेळके, रवी साळुंखे, ऍड. रतन मासेकर हे पाच जण इच्छुक आहेत. जनतेचा कौल घेऊन निवड कमिटी सर्वानुमते एक उमेदवार घोषित करण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta