बेळगाव : सालाबाद प्रमाणे श्री ज्योतिर्लिंग देवस्थान नार्वेकर गल्ली बेळगाव येथे ज्योतिर्लिंग देवाचा कार्तिक उत्सव व दिपोत्सव मोठ्या भक्तिभावाने पार पडला. श्री. दादा महाराज अष्टेकर यांच्या पश्चात चालू असलेली परंपरा अष्टेकर परिवार व नातेवाईक तसेच ज्योतिर्लिंग भक्त यांनी मोठ्या उत्साहात व भक्ती भावाने दरवर्षी प्रमाणे पार पडली. गेली 41 वर्ष पासून ही परंपरा अखंडित अष्टेकर परिवाराने जपली आहे. यावर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्रीराम सेना हिंदुस्तानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडूसकर व समाजसेवक प्रणय शेट्टी, खडेबाजार पोलीस उपनिरीक्षक पुजारी यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश अष्टेकर यांनी पार पाडले. श्री. भाऊराव अष्टेकर, ज्योतिबा अष्टेकर, हनुमंत पाटील, ज्ञानेश्वर अष्टेकर, मोहन नंद्वाळकर, ज्योतिबा गुरव, नागेश निलजकर, संजय हिरोजी व भक्त मंडळ यावेळी उपस्थित होते. आभार प्रदर्शन भुषण पाटील यांनी केले.